Posts

Showing posts from August, 2020

मोडी लिपी

  विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड मोडी लिपी   -  👉ही लिपि देवगिरीच्या यादवराजांचा श्रीकरणाधिप हेमाद्रिपंडित यानें लंकेहून आणली व त्यामुळें तिचें नांव पिशाचलिपि पडलें अशी सामान्य समजूत आहे.  याचा वाच्यार्थ असा कीं, 👉 हेमाडपंडितानें ही मूळ उपयोगांत आणिली असावी अथवा शोधून बनविली असावी. 👉 मोडीच्या सांप्रतच्या स्वरूपावरून ती देवनागरी (बाळबोधी) चीच परंतु लिहिण्यास सोयीच्या अशा मोडणीची बनलेली असावी असें दिसतें.  👉बाळबोधींत प्रत्येक अक्षर सुटें असतें व तें लिहिण्यास प्रत्येक वेळीं लेखणी उचलावी लागते त्यामुळें लेखनास बराच वेळ लागतो.  👉मोडींत ही अडचण काढून टाकली असून लेखणी न उचलतां कित्येक शब्दच्याशब्द एका टांकानें लिहितां येतात.  👉फारशी लिपींत जलद लिहिण्याची अशी एक (शिकस्ता नांवाची) लिपि आहे; त्या धर्तीवरच ही लिपि हेमाडपंतानें तयार केली असावी.  👉त्याच्या वेळीं मुसुलमानांचा साक्षांत संबंध जरी दक्षिणेंत नव्हता, तरी उत्तरहिंदुस्थानांत त्यांचें राज्य स्थापित झालें होतें व त्यांच्या राजवटींत तिकडे फारशी लिपीचा प्रचार झाला होता; तेव्हां ती लिपि डोळ्यां...